Monday, October 29, 2018

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत


जत,(प्रतिनिधी)-
 मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी व मतदार यादीतील व ओळखपत्रातील दुरुस्ती करण्यासाठी उद्या 31 ऑक्टोबर अखेर मुदत असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जतच्या तहसीलदारांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
भारत निवङणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2019 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता. याअन्वये 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी ज्या मतदार ज्या मतदारांची यादीमध्ये नावे पुन्हा समाविष्ट करायची असतील, तर त्यांनी संबंधित बीएलओकडे दि. 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत द्यावीत, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
 ते म्हणाले की, छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदार यांची रंगीत छायाचित्रे प्राप्त झालेली नाहीत, जे मतदान करीत आहेत, ज्या मतदार यांचा पत्ता चुकीचा आहे व त्या पत्त्यावर आढळून आलेले नाहीत; तसेच जे मतदार मयत आहेत अशा सर्व मतदारांची बीएलओ सुपरवायझर यांच्याकडून मतदारांच्या पुराव्याची खातरजमा करून नियमानुसार त्यांची वगळणी करण्यात आलेली आहे. ही यादी तहसील कार्यालय, जत ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर व तलाठी चावडीत नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तथापि ज्या मतदारांना मतदार यादीमध्ये त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करायची असतील तर त्यांनी संबंधितांकडे पुन्हा नोंदणी साठी नमुना सहा चे फॉर्म भरून द्यायचे आहेत. तसेच आपल्या नोंदीसाठी संबंधित बीएलओ यांची माहिती तलाठी ग्रामसेवकांकडे मिळते. त्यासाठी 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत देण्यात यावे, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment