'वैभवशाली जत' पुस्तकाचे प्रकाशन
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका कालही वैभवशाली
होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. मात्र या वैभवात आजच्या
तरुणांनी आपल्या मेहनतीने भर घालण्याचे काम करावे, असे आवाहन
बालगाव मठाचे मठाधिपती स्वामी अमृतानंद महाराज यांनी जत येथे बोलताना केले.
पत्रकार दिनराज वाघमारे यांच्या वैभवशाली जत या पुस्तकाच्या प्रकाशन
प्रसंगी ते बोलत होते. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार
विलासराव जगताप होते.
जत येथील श्री साईप्रकाश
मंगल कार्यालयात पार पडलेल्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना स्वामी अमृतानंद महाराज म्हणाले, जतला प्राचीन,
ऐतिहासिक परंपरा आहे. आज जत तालुका दुष्काळी म्हणून
ओळखला जात असला तरी फक्त इथे पाण्याचा दुष्काळ आहे. बाकी सर्वच
क्षेत्रात जत तालुका आघाडीवर आहे. बिळूर परिसरातल्या द्राक्षबागांमधून
सुमारे एक हजार कोटींचे दरवर्षी उत्पन्न घेतले जाते. साहित्य,
सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक
आणि राजकीय क्षेत्रातदेखील जत तालुका आघाडीवर आहे. आजच्या तरुणांनी
या वैभवात आणखी भर घालण्याचे आवाहन केले.
आमदार विलासराव जगताप म्हणाले, पत्रकारांनी
विनाकारण कुणाला विशेषणे लावून खोटी स्तुती करू नये. वास्तव मांडून
जतच्या विकासाला सहाय्य करावे. यावेळी अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे
अॅड. प्रभाकर जाधव, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, दैनिक पुढारीचे उपसंपादक
गणपत ( आबा) पवार, श्रीमंत शार्दुलराजे डफळे, प्रकाशक तानाजीराव जाधव यांची
मनोगते झाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वैभवशाली
जत या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक
पत्रकार दिनराज वाघमारे यांनी केले. यावेळी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या
संचालकपदी निवड झाल्याबद्दल दैनिक पुढारीचे उपसंपादक गणपत पवार आणि बालभारतीच्या आठवी
इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात धड्याचा समावेश झालेल्या शिक्षक,पत्रकार
आणि लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रकाशन सोहळ्याला जि.प.चे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील,माजी आमदार उमाजीराव
सनमडीकर, भा.ज.प.जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, जि.प.सदस्या सौ. स्नेहलता जाधव, जत पं.स.सभापती सौ. सुशिला तावंशी, उपसभापती
शिवाजी शिंदे, जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ शुभांगी बन्नेनवर,
उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, बांधकाम सभापती
भूपेंद्र कांबळे, नगरसेवक स्वप्निल शिंदे, नाना शिंदे, नीलेश बामणे, ईक्बाल
गवंडी, पं.स.माजी
सभापती मन्सूर खतीब,जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे,जि.प.सदस्य सरदार पाटील,
पं.स.सदस्य दिग्विजय चव्हाण,
श्रीदेवी जावीर,सौ.वनिता
साळे,बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण, आर. पी.आय. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे,अशोक बन्नेनवर, रा.स.प.नेते अजितकुमार पाटील, सरपंच
परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील, लायन्स क्लबचे जत तालुका
अध्यक्ष दिनकर पतंगे, कॉन्ट्रक्टर असोसिएशन अध्यक्ष सलीम गवंडी,
राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष मोहन माने-पाटील, मुचंडीचे सरपंच अशोक पाटील, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे सांगली प्रतिनिधी नामदेव भोसले, अलगूर महाराज आदि मान्यवर संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे राजेंद्र माने यांनी
केले तर आभार श्रीकृष्ण पाटील यांनी मानले. हा सोहळायशस्वीपणे पार पाडण्यासाठी सौ.लता वाघमारे, पत्रकार जयवंत आदाटे, किरण जाधव, भागवत काटकर,संजय गुरव,नाना गडदे, विश्वनाथ तळसंगी,
मनोहर पवार, परशुराम भोकरे, मच्छिंद्र ऐनापूरे, मच्छिंद्र बाबर,केराप्पा हुवाळे,दिलीप वाघमारे,दिगंबर सावंत आदींनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment