जत,(प्रतिनिधी)-
सेंट्रिंगचे काम करत असताना शिवानंद आवटी यांचा कटरने
जबडा फाटला होता. कै. शांताबाई
शिवशंकर आरळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल- मध्ये डॉ. राजेंद्र झारी यांनी शिवानंद आवटी यांच्यावर एका तासात यशस्वी शस्त्रक्रिया
करून त्याला पुन्हा नैसर्गिकरित्या पूर्वीसारखे केले असून अनेक नागरिकांनी डॉक्टरांचे
आभार मानले.
जत येथील
डॉ. रवींद्र आरळी यांचे कै. सौ.
शांताबाई शिवशंकर आरळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. या विभागात जनरल
सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, बालरोग, नेत्ररोग, नाक-कानघसा, दंत विभाग. सोनोग्राफी
आदी विभागात उपचार केले जातात. सर्जन म्हणून काम करणारे डॉ.
राजेंद्र झारी यांनी आतापर्यंत 245 यशस्वी शस्त्रक्रिया
केल्या आहेत. बिळूर येथील शिवानंद आवटी (वय 45) हा सेंट्रिंगचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करत
होता. तीनच दिवसांपूर्वी सळई कापत असताना चुकून कटरने त्याचा
जबडा व वरचे दोन्ही ओठ मध्यभागी फाटले होते. त्याला
30 टाके पडले होते. याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कळविताच डॉ.राजेंद्र झारी यांनी
त्याच्यावर अत्याधुनिक उपचार करून त्याची यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केली व त्याचे
दोन्ही ओठ, जबडे पुन्हा नैसर्गिकरित्या आहे त्याच पद्धतीने करण्यात
यशस्वी झाले. शिवानंद आवटी याची कमी खर्चात झारी यांनी यशस्वी
शस्त्रक्रिया केली. याबद्दल रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे
आभार मानले.
आरळी हॉस्पीटलच्या माध्यमातून एकाच छताखाली अनेक
सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. जत तालुक्यातील नागरिकांना वेगवेगळ्या
शस्त्रक्रियांसाठी सांगली, मिरज, कोल्हापूर,
पुणे या ठिकाणी जावे लागत होते; मात्र आर्थिकदृष्ट्या
परवडत नव्हते. त्याची दखल घेऊन डॉ. रवींद्र
आरळी यांनी एका छताखाली कै. शांताबाई आरळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची
स्थापना करून तालुक्यातील रुग्णांना चांगली सोय केली आहे. रुग्णांचे
पैसे व वेळही वाचत असल्याची प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment