जत,(प्रतिनिधी)-
दक्षता
जागृती सप्ताहाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरोधी कारवाईबाबत जनजागृती करण्यात येणार
आहे. सामाजिक संघटना, तालुका आणि गाव पातळीवरील
प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामसभेच्या माध्यमातून नागरिकांशी थेट
संवाद साधला जाणार आहे. लाच घेणे आणि देणे या दोन्ही गोष्टी गुन्ह्याच्या
स्वरुपाच्या आहेत. याची माहिती देऊन लाचलुचपतीबाबत वेळीच तक्रार
करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या दि.29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरच्या कालावधीत शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, बसस्थानक यासह गर्दीच्या ठिकाणी स्टिकर्स लावण्यात येणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाविषयीची शपथ दिली जाणार आहे. रॅलीच्या,
पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी दक्षता वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि.1 नोव्हेंबर रोजी भोकरे कॉलेज परिसरात जिल्हाधिकारी
विजयकुमार काळम, लाचलुचपत प्रतिबंधकचे पुणे विभागाचे उपायुक्त
संदीप दिवाण यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम होणार आहे. दि.
3 नोव्हेंबर रोजी तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात हा कार्यक्रमात
होत आहे.
No comments:
Post a Comment