Friday, October 26, 2018

जयसिंगपूरमध्ये आज 17 वी ऊस परिषद


सांगली,(प्रतिनिधी)-
 यंदाचा ऊसदर ठरविण्यासाठी आज (शनिवार) दुपारी दोन वाजता जयसिंगपूर येथे नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह मैदानावर 17 वी ऊस परिषद होत आहे. या परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे व सावकर मादनाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. शेतकर्यांच्या पाठबळामुळेच स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश येते, असे स्पष्ट करून सावकर मादनाईक म्हणाले, स्वाभिम ानीकडून ऊस परिषदेत उसाच्या उत्पादन खर्चावर आधारित दर मागितला जातो. यंदाच्या ऊस परिषदेकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांनी दौरा करून संपूर्ण राज्य पिंजून काढले आहे. यंदाच्या ऊस परिषदेस राज्यभरातून व कर्नाटक सीमाभागातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहतील.

No comments:

Post a Comment