येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे .सर्व कामाची खातेनिहाय चौकशी व काम वाटपाची निपक्ष चौकशी करावी अशी मागणी बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे यानी पत्रकार बैठकीत बोलताना केली आहे .
शासकीय नियमानुसार ज्या गावात जे. सी . बी . व पोकलँड मशीन उपलब्ध आहे त्याच गावातील ठेकेदाराला काम देणे आवश्यक आहे .परंतु शासकीय नियम डावलून इतर तालुक्यातील ठेकेदाराला काम देण्यात आले आहे .रवींद्र मनोहर सुतार यांच्या नावावर २६ लाख रुपयांचे काम देण्यात आले आहे .दराडे यांचे मशीन अंकुश शिंदे यांच्या नावावर दाखवून त्याला काम देण्यात आले आहे . शेडफार्म मधील संपूर्ण काम निविदा मंजूर होण्यापूर्वी पूर्ण करण्यात आले आहे . टक्केवारी मिळवण्यासाठी स्थानिक ठेकेदाराला डावलून बाहेरच्या ठेकेदाराला जत तालुक्यात आणून त्यांना काम देण्याचा घाट घातला जात आहे . असा आरोप प्रकाश जमदाडे यानी यावेळी बोलताना केला .जिल्हाधिकारी , जिल्हा कृषी अधिकारी , कृषी उप संचालक कोल्हापूर विभाग यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment