जत,(प्रतिनिधी)-
राज्य सरकारी कर्मचार्यांना 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर
2018 या 9 महिन्यांच्या कालावधीची 3 टक्के महागाई भत्त्याची थकबाकी ऑक्टोबरच्या वेतनात रोखीने देण्याचे आदेश देण्यात
आले आहेत. तसा आदेश काल काढण्यात आला आहे. मात्र तरीही राज्य सरकारी कर्मचारी शासनावर नाराज आहे.
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचार्यांचा महागाई भत्ता 1 जानेवारी 2018 पासून 139 वरून 142 इतका करण्यात
आला होता, तसेच ऑक्टोबर 2018 च्या वेतनात
या महागाई भत्त्याची रक्कम रोखीने देण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते.
मात्र 9 महिन्यांच्या थकबाकीचा निर्णय प्रलंबित
होता. अखेर आज याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाने काढला असून,
थकबाकीची रक्कम रोखीने दिली जाणार आहे.
महागाई
भत्त्याच्या थकबाकीची रक्कम मिळणार आहे. अंशदायी पेन्शन योजनेबाबत
त्वरित समिती नेमावी, सातव्या वेतन आयोगाच्या अंम लबजावणीसाठी
नेमलेल्या बक्षी समितीचा अहवाल तत्काळ प्राप्त करावा, चतुर्थश्रेणी
कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या
प्रश्नाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, पाच
दिवसांचा आठवडा, सेवानिवत्तीचे वय साठ वर्षे करावे, या मागण्यांसाठी मंत्रालयात निदर्शने करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment