रवा, मैदा, आटा, पोहे, खाद्यतेलांच्या दरात
मोठी वाढ
जत,(प्रतिनिधी)-
दिवाळी सणात फराळासाठी लागणारे सूर्यफूल, सोयाबीन, सरकी आणि पाम तेल, तसेच
रवा, मैदा, आटा, पोहे
आणि भडंगच्या दरात वाढ झाली आहे. तर गूळ, बेसन आणि शेंगदाणा तेलाचे दर मागील वर्षीच्या तुलनेत टिकून आहेत. त्यामुळे वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
दिवाळी फराळाचे साहित्य खरेदी करताना ग्राहकांचा
खिसा रिकामा होणार आहे. शासनाने हमीभाव जाहीर केल्याने आयातीत
मोठी वाढ झाली आहे. परिणामी खाद्यतेलाच्या दरात किलोमागे
10, रवा, मैदा, आटा,
पोह्यांच्या दरात 4, तर भडंगच्या दरात
10 रुपयांची वाढ झाली आहे. तर बेसनच्या दरात
20, साखरेच्या दरात 3, तर गुळाच्या दरात किलोमागे
4 ते 5 रुपयांनी घट झाली आहे. दिवाळी फराळासाठी लागणार्या वस्तूंत घटल्यापेक्षा दरात
वाढ झालेल्या वस्तूंची संख्या अधिक आहे. वाढलेल्या दराचा फटका
ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.
गूळ आणि बेसनच्या दरात घट झाल्याने त्याचा काही प्रमाणात
दिलासा मिळाला आहे. नारळ आणि मुरमुर्याचे दर मागील वर्षीच्या तुलनेत टिकून आहेत. मागील वर्षी
ऐन दिवाळी बाजारात गुळाचा तुटवडा पडला होता. त्यामुळे दरात अचानक
वाढ झाली होती. यंदा मात्र सर्व बाजूने बाजारात गुळाची आवक सुरू
आहे. मागणीच्या तुलनेत आवक अधिक आहे. तसेच
साखरेचीही नेमकी हिच स्थिती आहे. त्यामुळे दर घटले आहेत.
यंदा पावसामुळे सर्वत्र शेंगांचे पीक चांगले आले आहे. त्यामुळे बाजारात शेंगदाणा तेलाची आवक चांगली आहे. शेंगदाण्याची
आवक टिकून आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. दिवाळीमुळे घाउक आणि किरकोळ बाजारात ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली
आहे. त्यामुळे यापुढे फराळासाठी लागणार्या वस्तूंच्या दरात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता बोलली जात आहे.
यंदा घाऊक आणि किरकोळ बाजारात रसायन विरहित गुळाला
मोठी मागणी आहे. त्यामुळे बॉक्स पॅकिंंगचे दर इतर गुळाच्या तुलनेत
अधिक आहेत. रसायन विरहित गुळाला 3400 ते
3900 रुपये दर मिळत आहे. तर एक्स्ट्रा गुळाचा
3350 ते 3600 रुपये दर आहे. एक नंबरच्या गुळाचा दर 3200 ते 3300 आहे.
No comments:
Post a Comment