जत,(प्रतिनिधी)-
प्राथमिक
शाळांच्या वीज बिलासाठी चौदाव्या वित्त आयोगातून निधी द्यावा, यासाठी ग्रामपंचायतींना सूचना देऊ, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्याची
माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस दयानंद मोरे (जत)यांनी दिली.
शिक्षक
समितीच्या जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने नुकतीच सांगलीत मुख्यकार्यकारी अभिजीत राऊत यांची
भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे
कार्याध्यक्ष किरणराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड,
शिक्षक बँकेचे अध्यक्ष रमेश पाटील,उपाध्यक्ष राजाराम
सावंत,किसन पाटील, शशिकांत भागवत,
सयाजीराव पाटील, दीपक कोळी, यू. टी. जाधव, श्रेणीक चौगुले, बाळासाहेब आडके, हरिभाऊ गावडे, सतीश पाटील उपस्थित होते. प्राथमिक शिक्षण व शिक्षकांच्या प्रश्नावर मुख्य कार्यकारी
अधिकारी राऊत, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, लेखाधिकारी शार्दुल पाटील, एम. वाय. पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित
प्रश्नांबाबत चर्चा केली.
यावेळी
शिक्षकांना दीपावली अग्रीमसह ऑक्टोबरचा पगार एक तारखेला देण्यात यावा, पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांच्या वेतनातून अंशदान योजनेत कपातीबाबत जिल्हास्तरीय
कॅप लावून वैयक्तिक विकल्प फॉर्म भरून घेऊन भविष्य निर्वाह निधी खात्यावर वर्ग करावा,
भविष्य निर्वाह निधीच्या वार्षिक स्लीपमधील चुका दुरुस्त करून देण्यात
याव्यात, जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांची सेवापुस्तिका
अद्ययावत करून पंचायत समितीकडे पाठवावे, विस्थापित पती-पत्नी, स्तनदा माता, बदल्यांबाबत
आयुक्तांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी, सेवाज्येष्ठतेने केंद्रप्रमुख,
विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक पदोन्नतीचा लाभ द्यावा, यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यशवंत पंचायतराज
समितीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक आल्या बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकार्यांचे अभिनंदन शिक्षक समितीच्यावतीने करण्यात
आले.
No comments:
Post a Comment