Wednesday, October 24, 2018

उमदीत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन

जत, (प्रतिनिधी)-
उमदी ( ता.जत ) येथील सर्वोदय शिक्षण संस्था, संचलित महात्मा विद्यामंदीर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थानी कार्यानुभव विषयाच्या माध्यमातून टाकाऊ वस्तू पासून बनवलेल्या टिकाऊ वस्तूच्या प्रदर्शनास शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे  आणि कार्यानुभव शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
     ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बनवलेले साहित्य पाहून त्यानी समाधान व्यक्त केले . टाकाऊ  वस्तूचा  दैनंदिन जीवनात कशा पद्धतीने उपयोग करता येईल हे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी माहिती करून घेतले.
टाकाऊ वस्तूपासून तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन  बाजारात भरविण्यात आले होते . स्वतंत्र स्टाँल लावल्यामुळे आणि  रविवारच्या आठवडा बाजारामुळे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला . प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्यध्यापक व कार्यानुभव विषयाच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले . मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचा शिक्षणाधिकारी महेश चोथे, संस्थेचे चेअरमन आर. सी. होर्तिकर , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  रेशमाक्का होर्तिकर , मुख्याध्यापक  एस. के. होर्तिकर  यांनी सत्कार केला . यावेळी सचिन होर्तीकर उपस्थित होते .

No comments:

Post a Comment