दुय्यम निबंधकांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील
दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक वाय. आर. रोकडे हे गेल्या अनेक महिन्यांपासून खरेदी दस्ताची नोंद करत असताना अडवणूक
करत असून त्यांच्या कारभाराची चौकशी होऊन कारवाई करावी, या मागणीसाठी
जत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकांना निवेदन दिले असून या निवेदनावर बादशहा
निपाणी, शहाजी वाघमोडे, कृष्णा कोळी,
नितीन पोतदार, शंकरराव बिचुकले, हनुमंत कोळी, श्रीशैल हिप्परगी, प्रमोद सावंत, प्रवीण जाधव, समीर
मुल्ला, रमेश कोळेकर, नागेश पांढरे,
विवेक चव्हाण, बसवराज पाटील, रामचंद्र खांडेकर, रमेश तंगडी आदींच्या सह्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, जत येथील दुय्यम निबंधक
वाय. आर. रोकडे हे शासन नियमाप्रमाणे काम
न करता नागरिकांची अडवणूक करीत आहेत. दस्तनोंदणी करताना आवश्यक
नसताना व पत्राचे कलर झेरॉक्स; तसेच तारीख असलेल्या फोटोची सक्ती
करण्यात येते. पक्षकारांना प्रत्येक दस्तामागे चारशे ते पाचशे
रुपयांचा नाहक भुर्दंड बसत आहे. तालुक्यात सर्व गावात सातबारा
ऑनलाईन झाले असताना ऑनलाईन सातबारा सोबत हस्तलिखित सातबारा जोडण्याची सक्ती केली जाते.
शासन नियमाप्रमाणे गुंठेवारीची जागा सक्षम अधिकार्यांच्या ना हरकत दाखला घेऊन सर्वत्र केले जातात. परंतु
हे रजेवर गेल्यानंतर मात्र पर्यायी आलेले दुय्यम निबंधक अशी दस्त नोंदणी करतात.
त्यामुळे निबंधक बदलले की नियम बदलतात का, असा
प्रश्न नागरिकांना पडला आहे. दस्त नोंदणीसाठी
मुद्रांक नोंदणी फी; तसेच दस्त हाताळणी फी ऑनलाईन असताना दस्त
नोंदणीनंतर पक्षकाराकडून वेगळे शंभर रुपये व इतर फी घेत असून वरील सर्व गैरव्यवहाराची
चौकशी व्हावी व दुय्यम निबंधक रोकडे यांची बदली करावी, अशी मागणी
या निवेदनाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment