Thursday, October 25, 2018

बसर्गीत 'दारू नको दूध प्या' उपक्रम

जत,(प्रतिनिधी)-
  जत तालुक्यातील बसर्गी येथे कोजागिरी पोर्णिमेनिमित्त माणुसकी फौंडेशन  आणि उपसरपंच किशोर बामणे व हणमंत बामणे यांच्या पुढाकाराने बस स्टँड परिसरात  'मसाला दूध' वाटपाचा  कार्यक्रम करण्यात घेण्यात आला. यातून 'दारू नको दूध प्या' हा सामाजिक संदेश देण्यात आला.याला  ग्रामस्थ आणि तरुणांनी  भरभरून प्रतिसाद दिला. माणुसकी फौंडेशन नेहमीच सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेत असते.
   यावेळी जत पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ. सुशीला तावंशी यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्या म्हणाल्या,  माणुसकी फौडेशनने राबविलेला उपक्रम  स्तुत्य असून याचा आदर्श युवकांनी  घ्यावा असे आवाहन केले.
  या वेळी बसर्गी विकास सोसायटीचे अध्यक्ष शिवाप्पा तांवशी , तुळशीराम बामणे ,दत्ता बामणे, बसाप्पा कलमाडी, काडप्पा गुमाताज , पांडुरंग यादव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment