जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील
व्हसपेट ते संख, अंकलगी ते करजगी, लमाणतांडा
ते उटगी रस्ता काम करणार्या कंत्राटदार व जबाबदार अधिकार्यांच्या कथित भ्रष्टाचाराबद्दल चौकशी होऊन कारवाई करावी, अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रशेखर रेबगोंड यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.
निवेदनात
म्हटले आहे की, व्हसपेट ते संख, अंकलगी
ते करजगी, लमाण तांडा ते उटगी हे कामे आज अखेर झालेले मुख्य रस्त्याचे
काम अंदाजपत्रकाप्रमाणे व तांत्रिकदृष्ट्या झालेले नसून मूळ रस्त्याची पूर्णपणे खुदाई
न करता अस्तित्वात असलेल्या त्या रस्त्यावरच अल्प प्रमाणात खडी व डांबर मिश्रण करून
साईड पट्ट्या दर्जेदार न करता संबंधित यंत्रणेक डील अधिकार्यांशी
हाताला धरून रस्ता काम निकृष्ट केले आहे. तसे मूल्यांकन करून
कंत्राटदारांना बिलाची रक्कम दिल्याचे समजते. दोषी असणार्या कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर शासकीय नियमानुसार भ्रष्टाचाराबद्दल योग्य
ती चौकशी करावी.
जत पंचायत
समितीत माजी सभापती व त्यांच्या पतीने संगनम ताने अधिकाराचा गैरवापर करून
23 ऑक्टोबर रोजी बेकायदेशीर पत्रकार परिषद घेण्यासाठी वापर केला आहे.
तसेच पत्नी सभापती असताना त्यांचे वाहन विनापरवाना जिल्ह्याबाहेर खासगी
कामासाठी वापरले आहे. शासकीय मालमत्तेचा गैरवापर केले म्हणून
पत्नी मंगल जमदाडे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे व पती प्रकाश जमदाडे यांच्यावर
गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली.
तसेच व्हसपेठ ते गुड्डापूर रोडलगत श्री शिवनेरी स्टोन क्रेशर आहे.
तेथे बेकायदेशीररित्या काम चालू असून क्रशरमुळे प्रदूषण व पर्यावरणाच्या
दृष्टीने धोका निर्माण झाला आहे. हा क्रशर बंद करून संबंधितांवर
कारवाई करावी. जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग,
तहसीलदार, उमदी पोलीस, गटविकास
अधिकारी यांना दिलेले निवेदनाची सखोल चौकशी करून कारवाई करावी; अन्यथा कारवाई न झाल्यास 15 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण
करण्याचा इशारा चंद्रशेखर रेबगोंड यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment