बीड: शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी बीडमधील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी मुंडण आंदोलन केले होते. विशेष म्हणजे कर्जमाफीसाठी
या महिलांनीही मुंडण केले. मात्र, महिलांनी
प्रत्यक्षात मुंडण केल्याने त्यांच्यावर कुटुंबीय आणि इतर लोकांकडून मोठ्या प्रमाणात
टीका करण्यात आली. अशाप्रकारे केस कापल्यामुळे महिलांना अतिशय
वाईट वागणूक द्यायला सुरुवात झाली आहे.
बीडमध्ये शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी सध्या
या कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत. स्वाती जाधव या
शिवसेनेच्या या कर्जमाफी आंदोलनाच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून ओळखल्या जातात.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी
या आंदोलनात मुंडण केल्याने जाधव यांना घराबाहेर काढण्यात आले आहे. त्यांना पतीने घरातून हाकलून दिले, तर कुटुंबातील इतर
मंडळींनी त्यांना वाळीत टाकले आहे. त्यामुळे हे आंदोलन त्यांचा
संसार उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरले आहे. आता घराबाहेर पडण्याची
वेळ आल्यावर पक्ष त्यांच्याकडे लक्ष देईल असे वाटले होते. मात्र
तसे न होता पक्षानेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
No comments:
Post a Comment