जत, (प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उमदी येथील बाजारपेठेजवळ
असणाऱ्या संतोष येळमेली यांच्या टीव्हीकेबल यंत्रणा,
झेरॉक्स मशीन तसेच किराणा दुकानाला लागलेल्या आगीत अंदाजे बारा
लाखाचे नुकसान झाले आहे. दिवाळी सणासाठीचा माल आणून त्यांनी गोडावूनमध्ये ठेवला
होता.ऐन दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
उमदीत आठवडी बाजार ग्रामपंचायत लगत भरत
असतो.तिथेच सोसायटीचे पूर्वीचे गोडाऊन बांधलेले आहेत त्यातील एक गोडाऊन संतोष
येळमेली यांनी भाड्याने घेतले आहे .त्यात टीव्ही केबल मशनेरी , नवीन झेरॉक्स मशीन , झेरॉक्स मशीन साठी लागणारे
मटेरियल तसेच त्यांचे किराणा दुकान ही आहे.त्यातच तोंडावर दिवाळी सण अाल्याने
त्यांनी नवीन किराणामाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करून या गोडाऊनमध्ये
ठेवला होता.काल रात्री गोडाऊनला अचानक आग लागली व बघता
बघता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात गोडावूनमध्ये असलेले सर्व साहित्य आगीच्या
भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
आग लागल्याचे समजताच उमदीचे काँग्रेसचे नेते निवृत्ती
शिंदे सरकार यांनी धाव घेत आपल्या कार्यकर्त्याकडून दुकानास लागलेली आग आटोक्यात
आणण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी उमदीचे तलाठी बागेली यांनी धाव घेऊन पंचनामा
केला. तसेच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण संपागे यांनीदेखील भेट देऊन घटनेची
माहिती घेतली.दरम्यान, या ठिकाणी कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे सरकार व त्यांच्या
पत्नी संरपंच सौ.वर्षा शिंदे यांनी दुकान जळल्याने उघड्यावर पडलेल्या संतोष ऐळमेली
या कुटुंबास 51 हजार रुपयांची मदत दिली आहे.
No comments:
Post a Comment