सांगली,(प्रतिनिधी)-
सांगलीतील वखारभागातील पंजाब नॅशनल बँकेजवळ सोमवारी
दुपारी साडेचार वाजता दुचाकीची डिकी फोडून चोरट्याने दोन लाख 20 हजारांची रोकड लंपास केली. मटण मार्केटजवळील फिरोज निसार
संगतरास यांची ही दुचाकी होती. दरम्यान, घटनेनंतर तातडीने संगतरास हे शहर पोलिस ठाण्यात गेले.मात्र पोलिसांनीही तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.रात्री
उशीरा फिर्याद दाखल करून घेण्यात आली.
याबाबत
अधिक माहिती अशी, की संगतरास यांचा मटण मार्केटजवळ ऑफसेट प्रिंटिंगचा
व्यवसाय आहे. व्यवसायाच्या कामासाठी त्यांनी सोमवारी घरातील दोन
लाख 20 हजारांची रोकड घेतली होती रोकड त्यांनी दुचाकीच्या डिकीत
ठेवली होती. त्यानंतर ते वखारभागातील पंजाब नॅशनल बँकेत गेले.
याकाळात चोरट्यांनी पाळत ठेवून दुचाकीची डिकी फोडून रोकड लंपास केली.
दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर
काही वेळातच संगतरास हे दुचाकीजवळ आले. त्यानंतर चोरीचा प्रकार
उघडकीस आला. त्यानंतर संगतरास यांनी तातडीने शहर पोलिस ठाणे गाठले.
तेथील पोलिसांनी फिर्याद घेण्यासच टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
’साहेब आल्याशिवाय तक्रार घेणार नाही,’ असे सांगून
संगरास यांना तीन तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. रात्री आठ वाजेपर्यंत
गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. साडेआठच्या सुमारस गुन्हा दाखल
करण्यात आला. अकरा महिन्यांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात दोघांना
शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुन्हा कबुलीसाठी केलेल्या
अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला. त्यानंतरही उपनिरीक्षकासह
सार्यांना अटक झाली. तरीही पोलिस ठाण्यात
सुधारणा झाली नाही. अधीक्षक सुहेल शर्मा यांनी प्रत्येकाची तक्रार
दाखल करण्याचे आदेश दिले आहे, तरीही शहर पोलिसांची जुनी पद्धती
काही जात नाही. चोरी गुन्हा दाखल करण्यात का टाळाटाळ होत होती,
याची चौकशी होण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment