Sunday, October 28, 2018

मराठा समाजातील तरुणांची कर्ज योजनेकडे पाठ


जत,(प्रतिनिधी)-
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. परंतु, कर्ज घेताना बँकांनी लादलेल्या अटी, जामीनदार अशा किचकट निकषांमुळे आणि अपूर्ण माहिती असल्याने समाजातील तरुणांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या अटी, निकष यांची पूर्तता करण्यासाठी बँकेच्या अधिकार्यांना विशेष आदेश दिले असून, भविष्यात जिल्हा बँकांमार्फत देखील मदत घेण्याची आवश्यकता आहे.
  ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आलेल्या अर्जांपैकी अत्यंत त्रोटक प्रकरणे मंजूर झाली असून बँका सहकार्य करत नसल्याचे प्रमुख कारण, त्यातच कर्जदारासाठी जामीनदार, तारण अशा जाचक अटी, ग्रामीण भागातील तरुणांना असलेली अपूर्ण माहिती अशा अनेक कारणांमुळे ही योजना सामान्य नागरिकांपर्यंत फायद्याची ठरत नसल्याचे समोर आले.

No comments:

Post a Comment