जत,(प्रतिनिधी)-
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
2017-18 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत आटपाडी
तालुक्यातील यमाजी पाटलाची वाडीने पुणे विभागात दुसरा क्रमांक मिळविला. विभागात दुसरे स्थान मिळाल्याने यमाजी पाटलाची वाडी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी
पात्र ठरली. जिल्ह्यातून आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलाची वाडी
व शिराळा तालुक्यातील नाटोली या ग्रामपंचायती विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाल्या होत्या.
पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन प्रमाणे एकूण दहा ग्रामपंचायती
या स्पर्धेसाठी पात्र होत्या. या सर्व ग्रामपंचायतींची विभागस्तरीय
तपासणी विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली होती.
यमाजी पाटलाची वाडी हे गाव या स्पर्धेत वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता,
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शाळा व अंगणवाडी
स्वच्छता, सामाजिक सहभाग आदी घटकांत इतर ग्रामपंचायतीच्या तुलनेत
सरस ठरले. विभागात दुसरे स्थान मिळाल्याने यमाजी पाटलाची वाडी
राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरले. ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातील
कवठेपिरान, कोरेगाव, अंकलखोप, रावळगुंडवाडी आणि भिलवडी स्टेशन या गावांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
यमाजी पाटलाची वाडीला पहिला क्रमांक पटकाविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
त्यामुळे आता यमाजी पाटलाचीवाडी यांच्याकडून अभियानातील कामगिरीत सातत्य
राखून राज्यात बाजी मारण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment