जुनी पेन्शन
हक्क संघटनेचे आज आंदोलन
जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र
राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्यावतीने 23/10 च्या वरिष्ठ वेतन
श्रेणी निर्णयाविरोधात आज मंगळवार 23 आक्टोंबर रोजी काळ्या फिती
लावून काम करण्याचा निर्णय घेतला असुन सर्वानी काळ्या फित लावुन काम करून निषेध नोंदवावा
असे आवाहन जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले आहे.
अमोल शिंदे यांनी सांगितले, महाराष्ट्र शासनाच्यावतीने काढलेला 23 ऑक्टोबर
17 चा शासन निर्णय शालेय शिक्षकांच्या हक्काच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीच्या
अधिकारावर अन्यायकारक आहे. या शासन निर्णयाविरोधात निषेध म्हणून
दिनांक 23 ऑक्टोबर हा काळा दिवस म्हणून घोषित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णयावोरोधात आपला निषेध व्यक्त करण्यासाठी दिवसभर काळ्या
फिती लावून आपले शालेय अथवा कार्यालयीन कामकाज करावे. शाळेतील
सर्व शिक्षकासह या निषेध मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment