जत,(प्रतिनिधी)-
जतच्या दुष्काळी भागातील जनतेला स्वतः घरे बांधून
देणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात अल्प किमतीत स्वछता
गृहे बांधणे, असे स्वतःच्या उद्योगातून येणार्या उत्पन्नातून सामाजिक कामे करणार्या तुकाराम महाराज
याचे अण्णा हजारे यांनी कौतुक केले. तुकाराम महाराज यांनी त्यांच्या
चिकलगी भुयार व गोंधळेवाडीत मठात आध्यात्मिक कामाबरोबरच उद्योग उभारत असलेल्या कामाची
माहिती अण्णांना दिली. विविध विषयांवर अण्णा हजारे यांनी महाराजांना
मार्गदर्शन केले. त्याशिवाय जनहितासाठी काम कायम ठेवा;
मी तुमच्या पाठीशी आहे, असेही अण्णांनी सांगितल्याचे
तुकाराम महाराज यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment