Wednesday, October 24, 2018

महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे येण्याची गरज: भाग्यश्री न्हालवे


जत,(प्रतिनिधी)-
 ग्रामीण भागातील महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे येऊन सक्षम व्हावे, असे प्रतिपादन पुणे येथील कुंकू-टिकली मालिकेतील मराठी अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे यांनी केले. जत येथे विक्रम फौंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दांडिया स्पर्धेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे युवा नेते विक्रमसिंह सावंत होते.
अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे म्हणाल्या की, जत तालुका हा दुष्काळी तालुका असतानासुद्धा या तालुक्यातील महिला मात्र वेगवेगळ्या क्षेत्रात सक्षम आहेत. येथील राज्यकर्त्यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विक्रम सावंत म्हणाले की, विक्रम फौंडेशनच्या वतीने शहरातील महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून दोन ते तीन दिवस दांडिया स्पर्धा आयोजित केली जाते. यातून वेगवेगळे कलाकार घडतात. तसेच महिलांना स्वाभिमान जागृत करून देण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या असून याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा. महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करू असे आवाहन त्यांनी केले. यावेळी युवराज निकम, मीनल सावंत, प्राची जोशी, वर्षाताई सावंत, राजेंद्र माने, मनोहर पवार, बंडू शेख, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment