आढावा बैठकीचे आयोजन
जत,(प्रतिनिधी)-
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आज सांगलीत येत असून ते जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत.
यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून सकाळी अकरापासून सुरू
होणार्या या बैठकीत शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा
आढावा मुख्यमंत्री घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री
खातेप्रमुखांऐवजी थेट अधिकार्यांशी संवाद साधणार आहेत.
काम कमी असणार्या विभाग व तालुक्यांच्या नावे
लाल अक्षराने ठळक करण्यात आलेलेली आहेत. ज्यांचे काम कमी आहे,
त्यांची झाडाझडती घेतली जाणार असून मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागणार
आहे.
मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात येणार्या प्रेझेंटेशनवर फायनल हात फिरवला जात असल्याचे सांगण्यात आले. आज (बुधवारी) सकाळी अकरा वाजता
बैठकीस सुरुवात होणार आहे. 11 ते 1 या वेळेत
प्रधानमंत्री आवास योजना, ’जलयुक्त शिवार’सह शासनाच्या सर्व महत्त्वाकांक्षी व विशेषतः मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्षअसणार्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. महापालिकेसाठी
स्वतंत्र एक तास वेळ देण्यात आला आहे. या बैठकीत नगरोत्थान,
पाणी पुरवठा, ड्रेनेज, एसटीपी
याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर एक तास पोलिस दलाचा आढावा
घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी पोलिस अधिकार्यांसह सरकारी वकिलांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री सुभाष देशमुखांसह सदाभाऊ
खोत यांची उपस्थिती या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री सुभाष देशमुख,
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रवीणसिंह
परदेशी, विभागीय आयुक्त उपस्थित राहणार आहेत
No comments:
Post a Comment