जत,(प्रतिनिधी)-
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी बाळगल्यास यश हमखास मिळते. याकरिता ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे, असे आवाहन सेवानिवृत्त
आरटीओ इन्स्पेक्टर शिवाजीराव माने केले. श्री समर्थ शिवप्रभू
हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज येळवी (ता. जत) येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
कार्यक्रम पार पडला, त्यावेळी माने बोलत होते. यावेळी प्रा. अमृतराव काळोखे यांनी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले. शिवाजीराव माने यांनी स्कॉलरशिप
परीक्षा, स्पर्धा परीक्षेची पुस्तके शाळेस भेट दिली. लायन्स क्लब (पुणे) अध्यक्ष दामाजी
आसबे यांनी डस्टबीन भेट दिले. यावेळी मुख्याध्यापक दुंडाप्पा
तेली, भाऊसाहेब शिंदे, सचिन माने-पाटील, अॅड. सागर व्हनमाने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment