जत,(प्रतिनिधी)
राज्यातल्या प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी
जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सांगली जिल्हा 31 डिसेंबर अखेर तंबाखूमुक्त शाळा घोषित करावयाचा असून त्यादृष्टीने जतसह जिल्ह्यात
जोरदार हालचाली सुरू आहेत. जत तालुक्यातील शाळा यासाठी विविध
उपक्रम राबवून पालकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. उमराणी येथील शाळेतही विविध उपक्रम राबवण्यात आले असून तंबाखूमुक्त शाळा म्हणून
घोषित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी
काढली.
तंबाखू सेवनाविरुद्ध घोषणा दिल्या. नंतर शाळेत
पालकसभा घेतली. विद्यार्थी, शिक्षक,
पालक व ग्रामस्थांना तंबाखूचे सेवन केल्यामुळे होणार्या दुष्परिणांमाची जाणीव सौ. शारदा नाईक यांनी समजून
सांगितली. यावेळी सर्व उपस्थितांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन न
करण्याची शपथ घेतली. शाळेत जनजागृती उपक्रम म्हणून विविध स्पर्धा
रांगोळी, चित्रकला, डिजिटल स्पर्धा घेण्यात
आल्या. यावेळी सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती
सदस्य, मुख्याध्यापक जकाप्पा कोकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment