जत,(प्रतिनिधी)-
राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने वेळोवेळी अनुकम्पा भरतीबाबत जिल्हा परिषदेला आदेश देऊनही सांगली जिल्हा परिषद अनुकंपा भरती करायला तयार नाही. गेली तीन वर्षे ही भरती करण्यात आली नाही. तातडीने भरती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा अनुकंपा उमेदवारांनी दिला आहे.
सांगली जिल्हा परिषदेने 2015 पासून अनुकंपा भरती केलेली नाही. ही भरती केल्यास सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे, अशी भूमिका अनुकंपा उमेदवारांनी घेतली आहे. सध्या अनुकंपा उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 2015 पासून भरती केली नसल्याने उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे. ही भरती पंधरा दिवसांत न झाल्यास सर्व अनुकंपा उमेदवार जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणार आहेत, असा इशारा एका निवेदनाद्वारा दिला आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तानाजी व्हनमाने, महेश शितोळे, मनोज शिंदे, अविनाश गडदे, रंजना गडदे, बनाजी लोखंडे, जयश्री माळी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment