जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील वळसंग येथे कोळी समाज संघटनेच्या
वतीने महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन धाडस ग्रुपचे संस्थापक शरद कोळी यांच्या हस्ते
करण्यात आले. शरद कोळी म्हणाले, आम्ही कोणत्याही
एका समाजासाठी काम करीत नसून संपूर्ण राज्यातील समाजासाठी काम करीत आहे. भाजपने आमची सत्ता आली तर कोळी समाजाला महादेव कोळीचे दाखले देण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्यापपर्यंत या सरकारने दाखले दिलेले
नाहीत. त्यामुळे आमची आगामी काळात ताकद दाखवून देऊ आम्ही कुणापुढे
झुकणार नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले. माजी सभापती प्रकाश जमदाडे म्हणाले की, समाजातील सर्वच
लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी करणे गरजेचे आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष कृष्णा कोळी यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे.
अॅड. एम. के. पुजारी, आप्पासाहेब पाटील,
कृष्णा कोळी, अॅड.
अण्णाराया रेवूर, उपसरपंच मनीष चव्हाण,
नगरसेवक विजय ताड, महादेव कोळी, विठ्ठल कोळी, केंचाप्पा कोळी आदी कोळी समाजबांधव उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment