Friday, October 26, 2018

सांगली जिल्हा परिषदेचा गौरव


जत,(प्रतिनिधी)-
 यशवंत पंचायतराज अभियान 2016-17 मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी गौरव केला. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी अध्यक्षा स्नेहल पाटील, रणजित पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकार्यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी शिराळा, आटपाडी पंचायत समितीही बक्षीस देण्यात आले. मुंबईतील रवींद्र नाट्यगृहात यशवंत पंचायतराज अभियानाचे बक्षीस वितरण राज्यपाल राव यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे होत्या.

No comments:

Post a Comment