जत,(प्रतिनिधी)-
सन
2018-19 या वर्षात राज्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून सांगली
जिल्ह्यातील आटपाडी, जत, कडेगाव,
कवठेमहांकाळ, खानापूर व पलूस या 6 तालुक्यांमध्ये चारा टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये संबंधित तालुक्यातील पशुधनास आवश्यक चारा उपलब्ध
होण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण ही योजना
सांगली जिल्ह्यात पशुसंवर्धन खार्यामार्फत 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी
12 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार
आहेत. ही माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त संजय धकाते यांनी
दिली.
No comments:
Post a Comment