भाव 33 हजारांच्या घरात
जत,(प्रतिनिधी)-
दिवाळी तोंडावर आली आहे. त्याचबरोबर त्यानंतर येणारी लग्नसराई अशा या उत्सव काळात सोन्याला झळाली येऊ
लागली आहे. मंदीच्या लाटेत सण-लग्नतिथ्या
आल्याने सोन्याचा भाव वधारला तरी त्याला साहजिकच मागणी कायम राहणार आहे. सध्या सोन्याच्या भावाने 33 हजारांचे घर गाठले आहे.
आणखी भाव वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अनेक दिवसांपासून फार चढउतार नसणारा सोन्याचा भाव
आता वाढू लागला आहे.दिवाळी व त्यापासून सुरू होणारे सण,
लग्न समारंभ यामुळे ही तेजी कायम राहील, असे अंदाज
व्यक्त करण्यात येत आहेत. गेल्या पाच वर्षांत सोने दरात विक्रमी
वाढ झालेली नाही. ती आता होणार का, असेच
सर्वांना वाटत आहे. सोन्याचे दर रोजच्या रोज कमी-अधिक होतात. मात्र पाच-सहा वर्षांपूर्वी
सोन्याच्या दरात अचानक मोठी उलथापालथ झाली होती. 2013 साली सोन्याच्या
दरात विक्रमी वाढ होऊन हा दर 34 हजार 500 च्याही पुढे गेला होता. सोन्याच्या दराच्या इतिहासातील
हा उच्चांक आहे. पण गेल्या पाच वर्षांत सोन्याचे दर कमीच राहिले.
पाच वर्षांत दराचा उच्चांक मोडेल, अशी स्थिती नव्हती.
मात्र आता पुन्हा ती वेळ येते की काय, असे वाटू
लागले आहे.
सध्याचा सोन्याचा भाव पाहता तो उच्चांकी पातळी गाठतोय, अशी चिन्हे दिसत आहेत. सध्या बाजारपेठेत मोठी मंदी आहे.
अशावेळी व्यापार्यांच्या मदतीला सणासुदीचे दिवस
आले आहेत. सणाच्या निमित्ताने तरी ग्राहक येतील, अशी आशा आहे. दिवाळीच्या दरम्यान सोने खरेदीकडे लोकांचा
कल असतो. त्यामुळेच कधी नव्हे, ते आता सोने
खरेदीवरही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. काहींनी दागिन्यांच्या
मजुरीवर 5 टक्क्यांपासून 30 टक्क्यांपर्यंत
भर दिली आहे. काही ठिकाणी मोठ्या खरेदीवर बक्षीस योजना जाहीर
करण्यात आल्या असून त्यामधून ग्राहकांना खूष करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांत सोन्याच्या दरात फारशी
वाढ झालेली नव्हती. सोन्याचे झटपट दर वाढण्याचे प्रमाण कमी झाले
होते. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करणार्यांची संख्याही थोडी सुमारली होती. सोन्याचे दर वाढत
असल्याने व पुढेही काही दिवस दर वाढण्याची शक्यता असल्याचे सराफांकडून सांगण्यात येत
आहे.
No comments:
Post a Comment