जत,(प्रतिनिधी)-
फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदू देवता आणि राष्ट्रपुरुषांची
चित्रे छापली जातात. हे फटाके फोडल्यावर देवतांची विटंबना
आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत,
देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती अन्
विक्री कायमची बंद व्हावी, यासाठी कठोर कारवाई करावी,
अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
हिंदू जनजागृतीच्या कार्यकर्त्यांनी सांगली येथे
निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, आमदार सुधीरदादा
गाडगीळ, महापौर संगीता खोत, शहर पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी
हिंदू जनजागृती समितीचे संतोष देसाई, नारायण मेणकर, गोरक्षनाथ लिमकर, दत्तात्रय कुलकर्णी, हर्षद ढमाले उपस्थित होते. अवैध मार्गांनी चिनी फटाके
भारतात आणले जाऊन त्याची विक्री होते. यामुळे अशा फटाक्यांवर
प्रशासनाने बंदी आणावी; तसेच चिनी फटाके विक्री करणार्यांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात
आली.
No comments:
Post a Comment