Sunday, October 28, 2018

गणेश मडावी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान

जत, (प्रतिनिधी)-
जिल्हा परिषद सांगलीच्या कृषी विभागातील कनिष्ठ सहाय्यक गणेश मडावी यांना महाराष्ट्र शासनाकडून पंचायत राज अभियान अंतर्गत 'गुणवंत कर्मचारी पुरस्कार' देऊन मुंबई येथील कार्यक्रमात सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यशवंत पंचायत राज अभियान 2018 अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या  गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव समारंभ मुंबई येथे नुकताच पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालविकासमंत्री पंकजाताई मुंढे  यांच्या शुभहस्ते गुणवंत कर्मचारी  पुरस्कार 2017-18 हा   जिल्हा परिषद सांगलीच्या कृषी विभागातील  कनिष्ठ सहाय्यक व  कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र  राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी यांना प्रदान करण्यात आला.यावेळी त्यांच्या पत्नी रेणुका मडावी उपस्थित होत्या.मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मडावी यांनी सांगली जिल्हा परिषदेमध्ये गेल्या बारा वर्षेपासून उत्कृष्ट कामकाज सांभाळत आहेत.डी आर. डी. विभागात कार्यरत असताना इंदिरा आवास योजना,राजीव गांधी घरकुल योजना क्रमांक 2 ची प्रभावी अंमलबजावणी करीत अनेक गरजू व पात्र लाभार्त्यांना लाभ मिळवून दिला आहे.
सध्या विशेष घटक योजनेअंतर्गत पात्र मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरीचे लाभ मिळवून देण्याबरोबरच योजनेच्या माहितीसाठी  प्रबोधन करून वेळेत लाभ मिळवून दिला आहे. शासनाची योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी मडावी विशेष प्रयत्नशील असतात. शिवाय काष्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून  सामाजिक बांधिलकी ठेऊन त्यांनी मागासवर्गीय कर्मचारी-नोकरदारांचे हित लक्षात घेऊन त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. वरीष्ठ अधिकाऱ्याबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध  आहेत. त्यांचा कार्याचा गौरव म्हणून नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी नुकतेच  त्यांचा सन्मान केला आहे.                                                       यावेळी ग्राम विकास विभागाचे सचिव मा.असीम गुप्ता, कोकण विभागीय आयुक्त मा.जगदीश पाटील, मा.संग्रामभाऊ देशमुख, अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली उपाध्यक्ष तथा कृषि सभापती सुहास बाबर, शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रवी-पाटील,  मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, उपमुख्य कार्यकारीअधिकारी निलेश  घुले, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद लांडगे, महासंघ जिल्हा सचिव बाबासाहेब माने, आदित्य तिरमारे उपस्थित होते.
( पंचायत राज अभियान अंतर्गत गणेश मडावी  यांचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन  ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांनी गौरव केला.)

No comments:

Post a Comment