जत,(प्रतिनिधी)-
आज शिक्षण क्षेत्रात देखील कमालीचा ताण-तणाव वाढला आहे. या ताण -तणावातून मुक्त होण्यासाठी कवितेसारखा दुसरा पर्याय नाही. कविता ही जीवनामध्ये आनंद निर्माण करते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी केले.
जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्यवतीने कोजागिरी पोर्णिमेनिमित्त प्राध्यापकांसाठी काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मराठी विभाग प्रमुख प्रा. सौ. एन. व्ही. मोरे यांनी काव्यसंमेलन आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली.
कविता वाचनाने मन आल्हाददायी बनते. कवितेमुळे निर्मळ आनंदाची निर्मिती होती. मानवी मनातील दु:ख घालवून हास्य निर्माण करण्याची शक्ती कवितेमध्ये आहे.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विनोदी व हास्यनिर्माण करणा-या कविता सदर करून कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात वेगळाच रंग भरला. तर काही प्राध्यापकांनी विनोदी किस्से सांगून काव्यसंमेलनात वेगळीच रंगत आणली तर काहींनी सुरेल आवाजात आपल्या कविता सा दर करून रात्र जागविली. शेवटी गरम गरम दुध त्यात काजू, बदाम, पिस्ता, चारोळीचा स्वाद व साखरेचा गोडवा असलेले दुध पिऊन काव्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. कुमार इंगळे यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा. डॉ. दिनकर कुटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. सुरेखा व्हसमाने, प्रा. प्रकाश सज्जन, रामकृष्ण हेगडे यांनी परिश्रम घेतले. या काव्य संमेलनास प्रा. सी. वाय. मानेपाटील, प्रा. आर. डी. करांडे, प्रा. सिद्राम चव्हाण, प्रा. डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. श्रीमंत ठोंबरे, प्रा. एच. डी. टोंगारे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment