Wednesday, October 24, 2018

आधार कार्ड देण्याच्या कारणावरुन जतमध्ये पोस्टमनला मारहाण


जत, (प्रतिनिधी)-
          जत शहरातील पोस्ट कार्यालयातील कर्मचारी रमेश काडाप्पा हिरगोंड रा.रावळगुंडवाडी ता.जत यांनी  वेळेत आधार कार्ड  शोधून दिले नाही .म्हणून संतोष शिवाजी कोळी व आशोक मलकारी कोळी या दोघांनी  हिरगोंड यांना  मारहाण केली.ही घटना बुधवारी साडेआकरा वाजता पोस्ट आॅफिस जत येथे घडली.
          याबाबत अधिक माहिती अशी कि जत येथील संतोष शहाजी कोळी व अशोक मलकारी कोळी  हे दोघे जण एका व्यक्तीचे आधारकार्ड  आणण्यासाठी जत पोस्ट कार्यालयात गेले होते.त्यावेळी  पोस्ट  कर्मचारी रमेश हिरगोंड येथे कार्यरत होते .त्यांनी  लवकर आधारकार्ड काढून दिले नाही म्हणून  वाद झाला. या  वादानंतर पवन कोळी ,अशोक  कोळी व अनोळखी चौघांनी कर्मचारी रमेश हिरगोंड सह इतर दोघाना काठीने मारहाण केली. त्यात हिरगोंड जखमी झाले. याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा  दाखल झाला आहे. तपास काॅन्स्टेबल वीर करीत आहेत.

No comments:

Post a Comment