Wednesday, October 24, 2018

जतच्या 42 गावांचा पाण्यासाठी आंतरराज्य करार करा: आमदार जगताप


जत,(प्रतिनिधी)-
 राज्य सरकारने जत तालुक्यातील 42 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटकशी आंतरराज्य करार करण्याची मागणी आमदार विलासराव जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. जत तालुक्यातील सीमाभागात असणार्या 42 गावांमध्ये पाणीप्रश्न भीषण आहे. महाराष्ट्रातील पाणी कर्नाटकात जाते, त्या मोबदल्यात कर्नाटककडून सीमाभागातील 42 गावांसाठी पाणी घेण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली.
यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची पत्रकार बैठक झाली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात तर दुष्काळ हा शब्दही नव्हता; ‘टंचाईअसा उल्लेख होता. मात्र आम्ही तोदुष्काळकेला. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी राजकारणासाठी राजकीय वक्तव्य करीत दुष्काळाबाबत शब्दछल करण्याचे कारण नाही. शासनाच्या विविध योजनांचा जिल्हा पातळीवरील आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सांगलीत आले होते, त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला; शिवाय दुष्काळात करण्यात येणार्या सर्व उपाययोजनांची घोषणाही त्यांनीेली. दरम्यान, ‘जलयुक्तची कामे ही जनतेची आहेत. त्यामुळे त्या कामांबाबत अवमान करणे म्हणजे त्या जनतेचा अवमान करणे आहे. कृपया अशा जनतेचा अपमान करू नका, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. त्यावर बोलताना दुष्काळसदृश नको; दुष्काळ जाहीर करा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली. त्याबाबत विचारले असता, फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची चुकीची धोरणे आम्ही बदलली, असे ठामपणे सांगितले. जलयुक्त शिवार ही योजना सरकारची नव्हे, तर जनतेची आहे. गावंच्या गावं श्रमदानासाठी पुढे आली, त्यांच्या कष्टातून ही गावे जलपूर्ण झाली. या यशात त्या गावातील गावकर्यांचे कष्ट आहे. मात्र अशा चांगल्या कामालाही नावे ठेवून ही कामे उभारणार्या जनतेचा अवमान करू नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाली असल्याचा दावा केला जात असतानाच राज्यात अनेक ठिकाणी पाणी पातळी घटल्याचे पुढे येत आहेत. त्यामुळेजलयुक्तची कामे अपयशी ठरली, असा आरोप होत असल्याबाबत फडणवीस बोलत होते.
र्जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या कामांना गती आली आहे. बंदिस्त पाईपलाईनमुळे योजनचे बजेट 700 कोटी रुपयांनी कमी झाले. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व सिंचन योजनांची कामे डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. टेंभू योजनेतून सर्वाधिक क्षेत्र पाण्याखाली येईल. डिसेंबर महिन्यात टेंभूच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येईल, तर टप्पा पाचचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबतच्या सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment