Sunday, October 28, 2018

प्रतिभासंपन्न कवयित्री:डॉ. अरुणा ढेरे


ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांची 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काव्य, समीक्षा, ललित, वैचारिक इत्यादींसह साहित्यामधील विविध प्रकारांमध्ये डॉ. अरुणा ढेरे यांचे भरीव योगदान आहे. लोकसंस्कृतीचा अभ्यास हा त्यांच्या साहित्य प्रवासातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरी, सहा कथा संग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक ग्रंथ असे विविधांगी लेखन डॉ. ढेरे यांनी केले आहे. त्यांचाविस्मृतिचित्रेहा ग्रंथ अतिशय गाजला. त्याच बरोबरअंधारातील दिवे’, ’उंच वाढलेल्या गवताखालीसारखी वैचारिक पुस्तके; ’निरंजन’, ’प्रारंभ’, ’यक्षरात्र’, यांसारखे कवितासंग्रह बहुचर्चित ठरले. अंबरनाथ, बडोदे, वाशी, इंदूर, दापोली येथे झालेल्या विभागीय साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद ढेरे यांनी भूषविले आहे. डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान, सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.
प्रज्ञावंत कवयित्री ही ओळख असणार्या डॉ. अरुणा ढेरे यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1957 रोजी पुण्यात झाला. लोकसंस्कृतीचे व्यासंगी अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या त्या कन्या होत. डॉ. अरुणा ढेरे यांनी पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात पीएच.डी. मिळवली. पुणे विद्यापीठात त्यांनी प्राध्यापिका म्हणून 1983 ते 88 या काळात काम केले आहे. मराठीतील इंदिरा संत, शांता शेळके, पद्मा गोळे, संजीवनी अशा प्रतिभावंत कवयित्रींच्या पंक्तीत त्यांचे नाव घेण्यात येते. कवयित्री ही ठळक ओळख असली तरीही साहित्याचे विविध प्रकार डॉ. ढेरे यांनी समर्थपणे हाताळले आहेत. त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे
या शिवाय स्फुटलेखसंग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा विस्मृतिचित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला. स्वातंत्र्यपूर्व काळातील विशेष कारकीर्द घडविलेल्या महिलांवर त्यांनी विशेष लेखन केलेले आहे. महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणार्या मराठी विषयावरील उपयुक्त ग्रंथांची निवड करणार्या ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी 2017 पासून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरस्कार सन्मान साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे समजले जाणारे विविध पुरस्कार डॉ. ढेरे यांना मिळाले आहेत. यात लोकशाहीर विठ्ठल उमाप पुरस्कार, पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठानचा साहित्यदीप पुरस्कार, स्त्री-लिखित मराठी कविता या पुस्तकाला मसापचा 2017 सालचा ग्रंथ पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार आदी पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. निरंजन, प्रारंभ, मंत्राक्षर, यक्षरात्र आदी कवितासंग्रह, अज्ञात झर्यावर, काळोख आणि पाणी, कृष्णकिनारा, नागमंडल आदी कथासंग्रह, अंधारातील दिवे, उंच वाढलेल्या गवताखाली, उमदा लेखक- उमदा माणूस, उर्वशी, कवितेच्या वाटेवर, काळोख आणि पाणी, जाणिवा जाग्या होताना, जावे जन्माकडे आदी वैचारिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

No comments:

Post a Comment