जत,(प्रतिनिधी)-
सालाबादप्रमाणे
जत येथील मायाक्कादेवी व भाग्यवंतीदेवी यांच्या कोजागरी पौर्णिमेस (मंगळवार) भरविण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती
यात्रा कमिटी अध्यक्ष बसवराज अलगूर यांनी दिली. ते म्हणाले की,
मंगळवारी श्री मायाक्कादेवी व श्री भाग्यवंतीदेवी मूर्तीस पहाटे अभिषेक
व महापूजा, सकाळी भजन व देवीच्या गाण्याचा कार्यक्रम,
दुपारी महाप्रसाद, देवीच्या पालखीची ग्राम फेरी
(छबिना मिरवणूक) सायंकाळी पारंपरिक हेडाम खेळणे
व पुजारी महाराज यांची भाकणूक, रात्री धनगरी ओव्याचा कार्यक्रम
होणार आहे. यावेळी सुवर्णा अलगूर, राघवेंद्र
अलगूर, विजय यमगर, शांता यमगर उपस्थित होत्या.

No comments:
Post a Comment