जत,(प्रतिनिधी)-
तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीचे
सदस्य आप्पासाहेब सिध्दू माळी व न्यू इंग्लिश स्कूल कोसारीचे मुख्यध्यापक सुरेश लक्ष्मण
सावंत यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी जत पोलिसात
कुंभारी गावचे ग्रामस्थ काकासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अद्याप कोणाला ही अटक करण्यात आली नाही.
अधिक माहिती अशी की, आप्पासाहेब
माळी हे कुंभारी ग्रामपंचायत सदस्य आहेत. प्रभाग 4 मधून त्यांनी नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. सदर निवडणूकीसाठी त्यांनी हिंदू-माळी असल्याचे जातीचे
प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र,
आप्पासाहेब माळी यांच्या शाळा सोडल्याच्या दाखलावर हिंदू-लिंगायत अशी नोंद आहे. यासाठी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्यध्यापक
सुरेश सावंत यांच्याशी संगनमत करून शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू-लिंगायत ऐवजी हिंदू-माळी अशी नोंद केली होती.
माळी व सावंत यांनी संगनमत करून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्रे
सादर केल्याने त्यांच्यावर जत पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याचा अधिक तपास गजानन कांबळे आहे.
No comments:
Post a Comment