Thursday, October 25, 2018

सांगली जिल्हा सुपरफास्ट बातम्या


शुक्रवार दि. 26 ऑक्टोबर 2018

शासनाने वृत्तपत्र विक्रेते, एजंटांचे प्रश्न सोडवावेत :पाटील

सांगली,(प्रतिनिधी)- क्रांतिकारी वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहोचली असून संघटनेच्या माध्यमातून सर्व वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांचे हित साधले आहे. वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी उपनगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी केले. आष्टा (ता. वाळवा) येथील जायंट्स ग्रुपच्या हॉलमध्ये क्रांतिकारी वृत्तपत्र व एजंट यांच्या आयोजित मेळाव्यात बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव निकम, उपाध्यक्ष अनिल कुंभार, आनिल नांगरे, राजू माळी, प्रभाकर भंडारी, बालम जमादार आदी उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 पिंपळवाडीच्या सरपंचाच्या टोळीलामोका

सांगली,(प्रतिनिधी)- कवठेमहांकाळ तालुक्यासह सोलापूर, कोल्हापूर आणि कर्नाटकच्या सीमाभागात गंभीर गुन्ह्यांची मालिका निर्माण करून दहशत माजविणार्या टोळीवरमोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीचा म्होरक्या कवठेमहांकाळ तालुक्यातील पिंपळवाडीचा सरपंच रमेश आप्पा खोत आणि अक्षय शंकर पाटील य ा ं च् य ा स ह 17 जणांचा या टोळीत समावेश आहे. गुन्हेगारी हेच उपजीविकेचे साधन समजून मारामारी, बलात्कार, खून, खुनाचे प्रयत्न, सरकारी कर्मचार्यांवर हल्ले करून ही टोळी वर्चस्वासाठी गुन्हे करत सुटली होती.
अश्लील चाळे चालणार्या कॉफी हाऊसवर छापा
सांगली,(प्रतिनिधी)- तासाला शंभर रुपयांच्या मोबदल्यात तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी स्वतंत्र कंपार्टमेंट देणार्या विश्रामबागमधील कॉफी हाऊसवर पोलिसांनी गुरुवारी छापा घातला. या कारवाईत महाविद्यालयीन वयोगटातील दहा जोडपी सापडली.
किरकोळ कारणावरून एकास काठीने मारहाण
सांगली,(प्रतिनिधी)- रस्त्याकडेला टेबल लावण्याचा कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून तिघांनी संगनमत करून काठीने एका व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास देवचंद मेडिकलसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी धनंजय पाटील, तिलक पाटील, तेजस पाटील या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मैत्रिणीशी बोलणार्या तरुणास मारहाण
सांगली,(प्रतिनिधी)- विश्रामबाग चौकात मैत्रिणीबरोबर तरुण बोलत उभा राहिल्याचे सहन न झाल्याने कुपवाडच्या उल्हासनगरमधील दोघांनी त्या तरुणाला दगड मारून नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अनिकेत रामचंद्र कुलकर्णी (वय 19, पेठभाग) या तरुणाने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.
कर्जवसुलीसाठी महिलेस घरात घुसून मारहाण
 सांगली,(प्रतिनिधी)- कर्जवसुलीसाठी घरात घुसून महिला घरात असताना त्या घराला कुलूप घालून महिलेला कोंडणार्या चार जणांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मीनाक्षी मोहन राजमाने (कसबेडिग्रज) या महिलेने फिर्याद दिली आहे.
सांगलीत दोन गटात हाणामारी
सांगली,(प्रतिनिधी)- शहरातील गोसवी गल्लीत दोन गटात तुंबळ मारामारी झाली असून आचारी म्हणून काम करणारे गणेश आप्पा घाडगे (वय 38) यांनी संशयित विकी विजय गोसावी आणि गोविंद मारुती गोसावी या दोघांच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी काठीने गणेश यांना मारहाण करणार्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सांगलीत गुरव समाजाचे धरणे आंदोलन
सांगली,(प्रतिनिधी)- अखिल गुरव समाज संघटनेच्यावीने गुरव समाजाच्या इनाम जमिनीच्या प्रश्नासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. संपूर्ण राज्यात गुरुवारी एकाच दिवशी 36 जिल्ह्यांत हे आंदोलन करण्यात आले.
सांगली,(प्रतिनिधी)- क्रांतिकारी वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहोचली असून संघटनेच्या माध्यमातून सर्व वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांचे हित साधले आहे. वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी उपनगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी केले. आष्टा (ता. वाळवा) येथील जायंट्स ग्रुपच्या हॉलमध्ये क्रांतिकारी वृत्तपत्र व एजंट यांच्या आयोजित मेळाव्यात बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव निकम, उपाध्यक्ष अनिल कुंभार, आनिल नांगरे, राजू माळी, प्रभाकर भंडारी, बालम जमादार आदी उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मिरज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
सांगली,(प्रतिनिधी)- सांगली जिल्हा आढावा बैठकीत आमदार सुरेश खाडे यांनी मिरज तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा; तसेच मिरज तालुक्यातील प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी केली.
कवठेमंहकाळ तहसीलदार कार्यालयासमोर खोकीधारकांचे बेमुदत उपोषण
सांगली,(प्रतिनिधी)- येथील जुने स्टँड परिसरातील फळे, भाजीपाला विक्रेते, खोकीधारक यांचे शासकीय जागेतील अतिक्रमण नियमित करावे, या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटनेसह फळविक्रेते, खोकीधारकांनी उपोषण सुरू केले. माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत शेजाळ यांनी उपोषणस्थळी भेट दिली.
शॉर्टसर्किटने उसाच्या फडास आग
सांगली,(प्रतिनिधी)- कवठेपिरान येथे दोन एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाला. त्यामध्ये चार लाख रुपयांचे नुकसान झाले. साखर कारखाने सुरू नसल्याने जळका उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील मळी भागातील रावसो कल्लापा पाटील यांचा गट नंबर 1319 मधील 20 आर ऊस क्षेत्र, तर प्रशांत बाळासो पाटील यांचे 20 आर दादासो नरसू पाटील यांचा 20 आर, महावीर बाळासो पाटिल यांचा 20 आर ऊस पेटला आहे. एकूण दोन एकर आडसाली जाणारा ऊस पटल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भिलवडी स्टेशनजवळील ऊसतोडी बंद पाडल्या
सांगली,(प्रतिनिधी)- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भिलवडी स्टेशनजवळ सुरू असलेल्या साखर कारखान्याच्या ऊसतोड बंद करून कामगारांना हुसकून लावले. तसेच काही कारखान्याचे कर्मचारी शेतकर्यांना चुकीची माहिती देऊन आमची संघटनेशी चर्चा झालेली असून आम्ही तोड घेतलेली आहे, अशी चुकीची माहिती देत आहेत, तरी शेतकर्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 27 ऑक्टोबर रोजी ऊस परिषद आहे. त्या परिषदेत खासदार राजू शेट्टी व शेतकरी जो दर ठरवतील, तो साखर कारखान्याला द्यावा लागणार आहे. तरी उसाचा दर ठरेपर्यंत शेतकर्यांनी तोडी घेऊ नयेत. तशा तोडी घेतल्या व कारखान्यांनी जबरदस्ती केली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील कोणत्याही घडलेल्या घटनेत जबाबदार असणार नाही. कारण आता शेतकरी हा जागृत झाला आहे. त्यामुळे संघटनेपेक्षा शेतकरी आक्रमक झाला असून ती जबाबदारी सर्वस्वी कारखाना वाहनमालक व शेतकर्यांची राहील, असे संदीप राजोबा यांनी सांगितले.
बसूरचे सायकलपटू करणार 175 किलोमीटर प्रवास
सांगली,(प्रतिनिधी)- बिसूर येथील सायकलपटू विलास दत्तू घारगे हे बिसूर ते बाळेकुंद्री 175 किलोमीटर सायकलप्रवास करणार आहेत. गेल्या 12 वर्षांपासून ते वेगवेगळ्या ठिकाणी सायकल प्रवास करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी सांगली ते लखनऊ हा 1600 किलोमीटर सायकलप्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. तसेच पुणे, सातारा, जत, कोल्हापूर, शिराळा, चांदोली धरण असा सायकलप्रवास केला आहे. या दरम्यान ते तरुणांना आरोग्य, सामाजिक, एकात्मता, पर्यावरणरक्षणाचा संदेश देतात. सायकलप्रवासाचे महत्त्व ते तरुणांना पटवून सांगतात. या काम ाबद्दल आभाळमाया फौंडेशनचे अध्यक्ष आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, तत्कालीन पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर यांच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
साईप्रसाद चव्हाणनासाच्या दौर्यासाठी रवाना
सांगली,(प्रतिनिधी)- तासगाव येथील सातवीत शिकणारा ब ा ल वैज्ञानिक साईप्रसाद चव्हाण हा 11 दिवसांसाठी अमेरिकेतीलनासाच्या शैक्षणिक दौर्यावर रवाना झाला आहे. ’नासाही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे. साईप्रसादला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते मुंबई येथे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक म्हणून नुकतेच सन्मानित करण्यात आले. साईप्रसाद नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमि निस्ट्रेशन, ऑरलैंडो न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसीनायगारा फॉल्स या ठिकाणी भेटी देणार आहे. या 11 दिवसांच्या शैक्षणिक दौर्यात तेथील शास्त्रज्ञांच्या भेटी घेऊन संवाद साधणार आहे. साईप्रसाद हा तासगाव येथील आयकर व जीएसटी सल्लागार आणि केंद्रीय जीएसटी सार्वजनिक तक्रार समिती, कोल्हापूर आयुक्तालयाचे सदस्य अविनाश चव्हाण यांचा मुलगा आहे.




No comments:

Post a Comment