पुणे: भंगार विक्रीच्या
कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाच्या पत्नीला नातेवाईकाकडे सोडविण्याच्या
बहाण्याने सोबत नेऊन एका पडक्या घरात दोन जणांनी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना शनिवारी खेड तालुक्यातील धानोरे येथे घडली. याप्रकरणी
चार जणांना आळंदी पोलीसांनी गजाआड केले आहे.
सद्दाम अब्दुलबारी हुसेन, बिर्याणीवाला सलमान भाई, सचिन अशोक गावडे आणि आकाश अनिल
झरकर (सर्व रा. धानोरे, ता. खेड) अशी अटक केलेल्या चौघांची
नावे आहेत. याप्रकरणी 35 वर्षीय विवाहितेने
आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत विवाहितेच्या पतीचे
आरोपी सद्दाम याच्याबरोबर भंगार विक्रीच्या कारणावरून भांडण झाले होते. याचा राग आरोपी सद्दामच्या मनात होता. 27 ऑक्टोबर रोजी
आरोपी सद्दाम आणि सलमान यांनी आरोपी सचिन आणि आकाश यांच्याबरोबर संगनमत केले.
पीडीत विवाहितेला कुदळवाडी येथील तिच्या नणंदेच्या घरी सोडण्याच्या बहाण्याने
सचिन आणि आकाशने स्वत:बरोबर धानोरी येथील एका पडक्या घरात नेले.
तेथे चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment