Wednesday, October 31, 2018

एसटीच्या तिकीट दरात दहा टक्के हंगामी दरवाढ


16 नोव्हेंबरपर्यंत दरवाढ लागू राहणार
जत,(प्रतिनिधी)-
दिवाळीनिमित्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने तिकीट दरात 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ आज (गुरुवार) पासून लागू होणार असून 16 नोव्हेंबरपर्यंत राहील. याआधी एसटीने जारी केलेल्या पत्रकात 20 नोव्हेंबरपर्यंत हंगामी दरवाढ लागू असेल, असे सांगण्यात आले होते. परंतु, 19 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असल्याने भाविकांना वाढीव दरात प्रवास करावा लागू नये यासाठी ही भाडेवाढ 1 ते 16 नोव्हेंबरदरम्यान असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ऐन सणाच्या काळात हंगामी भाडेवाढ करण्यात आल्याने वाढत्या महागाईत आणखी भर पडली आहे. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. दिवाळीसाठी शहरातून राज्याच्या कानाकोपर्यात जाणार्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. आधीच खासगी गाड्यांनी अव्वाच्या सव्वा दरवाढ केली आहे, आता त्यात महामंडळाच्या गाड्यांची भर पडली आहे.

No comments:

Post a Comment