Tuesday, October 30, 2018

चांगल्या रस्त्यांमुळे ग्रामीण भागाचे अर्थकारण वधारेल : खासदार संजयकाका पाटील


जत,(प्रतिनिधी)-
चार वर्षात जिल्ह्यातील रस्त्यांचा बॅकलॉग  पूर्ण करू शकलो याचे समाधान आहे. ग्रामीण भागातील रस्त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने कोट्यावधीचा निधी दिल्याने  शेतीपूरक व्यवसायाची चलती होणार आहे. यामुळे ग्रामीण भागाचे अर्थकारण वधरणार आहे, असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले. अर्थसंकल्पीय व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तालुक्यातील 32 रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ खासदार संजयकाका पाटील व  आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
खासदार पाटील म्हणाले, आमदार जगताप सारखा अभ्यासू माणूस निवडून आल्याने तालुक्याचा विकास गतीने होत आहे. तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने विकासाची दारे खुली झाली आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा तालुका मोठया विश्वासाने आमच्या पाठीशी राहिला. निवडणुकीच्या वेळी लोक पाण्याचा समस्यांचा पाढा वाचत होते. त्यामुळे आमदार जगताप आणि मी अथक प्रयन्त करून म्हैसाळची योजना पंतप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करायला लावले. त्यामुळे या योजनेला निधी मिळाला आहे. त्यामुळे लवकरच तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी येणार आहे.
आमदार जगताप म्हणले, रस्त्याचा बॅकलॉग भरून काढताना तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून आणले. त्याची कामे सुरू आहेत. कोण काय टीका करताय याकडे लक्ष न देता केवळ विकासाचे धोरण समोर ठेवले आहे. भाजप सरकारने शहराबरोबरच ग्रामीण  रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्याचा बॅगलॉग भरून काढता आला.  येणार्या काळात आणखीन विकासाला गती देणार आहोत, असेही जगताप यांनी स्पष्ट केले,
दरम्यान, तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी 42 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यात जत ते उमराणी (128 लक्ष), बसर्गी ते गुगवाड (79 लक्ष), जिरगयाळ ते वज्रवाड (29.25 लक्ष), डफळापूर ते अनंतपुर (21.50 लक्ष), अंकले ते डफळापूर (246 लक्ष), प्रतापूर ते खांडेकर वस्ती (147.98 लक्ष), कुंभारी ते चौगुले वस्ती (276.79 लक्ष), कुंभारी ते बेळूखी (89  लक्ष), कंठी ते बाज (138 लक्ष), कुंभारी ते कोसारी रस्त्यावर पूल बांधणे (87 लक्ष), शेगाव ते कोसारी रस्त्यावर पूल बांधणे (128 लक्ष), शिंगनहळळी ते वाळेखिंडी (138 लक्ष), जवळा जिल्हा हद्द ते डिसकळ (57 लक्ष), सावंतवाडी फाटा ते निगडी खुर्द (87 लक्ष), येळवी ते निगडी (85 लक्ष), नराळे ते घोलेश्वर (187 लक्ष), जिल्हा हद्द ते खैराव (105 लक्ष), येळवी ते चौगुले वस्ती (पारे रोड) (134 लक्ष), येळवी ते हंगीरगे (20 लक्ष).वळसंग ते कोळगिरी (173 लक्ष), कोळगिरी ते सोरडी (137 लक्ष), आसंगी ते ललमाणतांडा (.) (343 लक्ष), गोंधळेवाडी ते कुलाळवाडी (326.61 लक्ष), अंकलगी ते संख (103 लक्ष), उटगी ते अंकलगी (210 लक्ष), सोन्याळ ते बगली वस्ती (134 लक्ष), उमदी ते सोनलगी (191 लक्ष), उमदी ते सुसलाद (73 लक्ष), बोर्गी ते आक्कळवाडी (105 लक्ष), आक्कळवाडी ते गिरगाव (106 लक्ष), मोरबगी ते माणिकनाळ (90.75 लक्ष), संख ते तिकोंडी (75.50 लक्ष) या रस्ता कामाचा समावेश आहे, यासाठी एकूण 42.70 लक्ष निधी खर्च होणार आहे.
यावेळी सभापती सुशीला तांवशी, उपसभापती शिवाजी शिंदे,  जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, सौ मंगल नामद, सौ स्नेहलता जाधव, महादेव पाटील, माजी सभापती प्रकाश जमदाडे, आप्पासाहेब नामद, शिवाप्पा तांवशी, दिग्विजय चव्हाण, अप्पा मासाळ, अर्चना पाटील, मन्सूर खतीब, अभिजित चव्हाण,  प्रभाकर जाधव, लक्ष्मण बोराडे,  राजू चौगुले, सज्जन चव्हाण, महादेव पाटील, कुंडलिक दुधाळ, माणिक वाघमोडे, नाथा पाटील आदी उपस्थितीत होते.


                            जत: अर्थसंकल्पीय व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 32 रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करताना
खासदार संजय काका पाटील व मा. आमदार विलासराव जगताप आदी

No comments:

Post a Comment