जत,(प्रतिनिधी)-
भारत सरकारने
सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रूबेला या आजाराचे
नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी टप्प्या-टप्प्याने गोवर रूबेला ही लस विविध राज्यामधील नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये
समाविष्ठ करण्यात येत आहे. त्यानुसार नोव्हेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रूबेला लसीकरण मोहीम आयोजित केली आहे.
या मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये 9 महिने ते 15 वर्षापर्यंत वयोगटातील जवळपास 8 लाख 24 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारित
केले आहे. यापैकी काही लाभार्थ्यांना जरी अगोदर गोवर रूबेला लस
दिली असेल तरी त्यांना हा अतिरिक्त डोस द्यावयाचा आहे. समाजामध्ये
या मोहिमे- बाबत जनजागृती व सुरक्षितता निर्माण करण्यासाठी तसेच
मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
वि. ना. काळम यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment