Monday, October 29, 2018

मिरजेत जुगार अड्ड्यावर छापा


सांगली,(प्रतिनिधी)-
 मिरजेतील बेळगाव रेल्वे फाटकालगत असलेल्या शेतातील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला. तेराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 32 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 मारुती प्रताप भोसले (34, संगम सोसायटी), अनिल नानासाहेब छत्रे (29, सुभाषनगर), पवन इंद्रव्या कांबळे (31, कोल्हापूर रोड) यांना अटककरण्यात आली. सुधाकर कोरे, अमीर पठाण, लियाकत पठाण, रमजान पठाण, शकील पठाण, अस्लम, विकी (पूर्ण नाव नाही, रा. गोसावी गल्ली), मकरंद रजपुत (पाटील गल्ली), संतोष (पूर्ण नाव नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, की मटका-जुगारासह अवैध धंदे रोखण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी एलसीबीला दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे.
 मिरजेतील बेळगाव रेल्वे फाटकाजवळ सुधाकर कोरे यांचे शेत आहे. तेथे तीन पानी जुगार चालत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. त्यावेळी तेथे तीन पानी जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले. पत्त्याची पाने, रोख रक्कम, मोबाइल असा 32 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, राजु कदम, अमित परीट, संतोष कुडचे, सुनील लोखंडे, शशिकांत जाधव, विकास भोसले, किशोर काबुगडे यांचा कारवाईत सहभाग होता.

No comments:

Post a Comment