Monday, October 29, 2018

बोर्गीत सिलेंडर स्फोटात महिला ठार


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बोर्गी येथील सुमित्रा बसप्पा कांबळे (वय 50) यांचा गॅस सिलेंडरच्या स्फोटात मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. त्यांच्यावर मिरज सिव्हिलमध्ये उपचार सुरू होते.
सुमित्रा कांबळे यांना गेल्याच आठवड्यात उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळाले होते. रविवारी रात्री नऊ वाजता त्या स्वयंपाक करत असताना अचानक स्फोट झाला आणि झोपडीने पेट घेतला.यात त्या सुमारे 80 टक्के भाजल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र काल उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या स्फोटात झोपडी जळून खाक झाल्याने संसारोपयोगी साहित्य व अन्य जिन्नस असे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी व महिलेला उपचारासाठी मिरजेला हलवण्यासाठी बोर्गी येथील सहारा ग्रुपचे सदस्य आणि उपसरपंच राघवेंद्र होनमोरे, दावल पुळूजकर आदींनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment