Saturday, October 27, 2018

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती करावी : जिल्हाधिकारी

जत,(प्रतिनिधी)-
 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत अन्यायग्रस्तांना पीडितांना न्याय देण्याचे काम केले जाते. या कायद्यांतर्गत असणार्या हक्कांची जाणीव व्हावी, न्याय कुठे मागावा, याची माहिती मिळावी; तसेच या कायद्याबाबत असणारे गैरसमज दूर व्हावेत, यासाठी जास्तीत जास्त जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यशाळा, शिबिरांचे आयोजन करावे. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी गावोगावी-खेडोपाडी या कायद्याची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 (सुधारीत अधिनियम 2015) या विषयी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह येथे ही कार्यशाळा झाली.

No comments:

Post a Comment