Wednesday, October 24, 2018

बागलवाडीच्या शाळेचा ‘तंबाखूमुक्त शाळे’त समावेश


 जत,(प्रतिनिधी)-
 प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे आणि सलाम मुंबई फौंडेशन यांनी प्रमाणित केलेले सर्व 11 निकष पूर्ण करीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बागलवाडी ही जत तालुक्यातील तंबाखूमुक्त शाळा घोषित करण्यात आलेली आहे.
 जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील डॉ. एस. . खिलारे, डॉ. एन. बी. पवार यांनी या अभियानांतर्गत निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव केला. डॉ. डी. जी. पवार यांनीही अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल बागलवाडी शाळेला प्रमाणपत्र दिलेले आहे. मुख्याध्यापक प्रकाश गुदळे यांनीही शाळा तंबाखूमुक्त होण्यासाठी सचोटीने प्रयत्न केले. यावेळी सरपंच लक्ष्मी खांडेकर, शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष खांडेकर, चंद्रकांत खांडेकर, प्रमोद खांडेकर, सुनीता खांडेकर, सचिन खांडेकर, विद्या खांडेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment