Saturday, October 27, 2018

आठवडाभर हवेत गारवा राहणार

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्तान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओरिसा, या सर्व भागांवर हवेच्या दाबात वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागातील कमाल आणि किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत घट होणार आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी रात्री आणि पहाटे हवामान थंड राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविला.
 राज्याच्या मध्यापासून उत्तरेकडील भाग, दक्षिण कोकणच्या किनारपट्टीवर हवेचा दाब कमी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मध्यापासून उत्तरेकडील भागात हवामान थंड राहणार आहे. दरम्यान काल मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागातील किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील किमान तपमानात सरासरीपेक्षा 2 ते 6 अंशांनी, तर कमाल घट झाली आहे. काल नगर येथे उच्चांकी 38.2 कमाल आणि तेथेच नीचांकी 13.8 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली.

No comments:

Post a Comment