जत, (प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील काराजनगी येथील संजय हरिदास पवार (वय ४०) हे भाजून गंभीर जखमी झाल्याने मयत झाले. ही घटना गुरुवारी रात्री नऊ वाजता राहत्या घरात घडली आहे. भाजण्याचे कारण समजले नसले तरी त्यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय पवार हा तरुण काराजनगी येथील राहत्या घरी भाजल्याने गंभीर जखमी अवस्थेत शेजाऱ्यांना मिळून आला, त्यास तातडीने उपचारासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते, पण तो आधिक भाजल्याने त्यास जतहून सांगलीला हलवण्यास डॉक्टरांनी सांगितले. आले होते, परंतु त्याचा वाटेतच ते मृत्यू झाला.याबाबत जत पोलिसात भाऊ विजय हरिदास पवार यांनी फिर्याद दिली. तपास संजय माने करीत आहेत.दरम्यान, संजय पवार हे अलीकडे नैराश्य जीवन जगत होते, गुरुवारी रात्री त्यांनी स्वतः पेटवून घेतल्याची चर्चा काराजनगी परिसरात आहे,
No comments:
Post a Comment