Friday, October 26, 2018

सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने वृद्धेचे 8 तोळ्यांचे दागिने लंपास


सांगली,(प्रतिनिधी)-
 सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याचा बहाणा करून वृध्देचे आठ तोळ्याचे दागिने हातोहात लंपास करण्याची घटना शुक्रवारी वखारभागात घडली. याप्रकरणी अल्पेश सतीश शहा यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एक लाख सतरा हजार रुपयांचे दागिने भामट्यांनी लंपास केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सांगली शहरातील वखारभागात जुन्या पद्मा चित्रमंदिरनजीकच्या पानाचंद इमारतीत राहणार्या श्रीमती राजूलबेन सतीश शहा (वय 77) या वृध्देला दोन भामट्यांनी अंगावरील दागिने पॉलिश करून देण्याचे आमिष दाखविले. नेहमीच्याच पध्दतीने दागिने एका भांड्यात टाकल्यासारखे करून पाणी गरम करून आणण्यासाठी श्रीमती शहा यांना पाठविले. थोड्यावेळानेदागिने काढून घ्या,’ असे सांगून भामटे पसार झाले. त्यानंतर शहा यांनी पाहिले असता त्या भांड्यात दागिने नव्हते. आपले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी हा प्रकार आपल्या मुलाला सांगितला. ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

No comments:

Post a Comment