Friday, October 26, 2018

आमदार जगताप,विक्रम सावंत, सुरेश शिंदे यांच्याकडून नुकसानीची पाहणी


जत,(प्रतिनिधी)-
जत शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटगेवाडी, रामपूर, वाषाण परिसरात गुरुवारी झालेल्या वादळी वार्याच्या तडाख्यात मका, द्राक्ष, पपई,उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्राथमिक पाहणीत सुमारे पाच कोटींची हानी झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे आदींनी केली.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना भेटून दिलासा दिला. नुकसान भरपाई तातडीने मिळावी,यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले. विक्रम सावंत यांच्यासोबत काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष अप्पाराया बिरादार, माजी पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, फिरोज नदाफ, ग्रामपंचायत सदस्य रमेश कोळेकर, राजू इनामदार, मजू ऐनापुरे, बंटी नदाफ, सलीम नदाफ, मकबूल नदाफ, पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment